"मालेगाव शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश भागांमध्ये नगरपंचायती मार्फत काही ठिकाण वरून पाईप लाईन काही भागात बोअरवेल उभारण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी आमदार भावनाताई गवळी, मी, सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली. या सामूहिक प्रयत्नांमुळे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर काटकसरीने करावा." — ओम खुरसडे, नगराध्यक्ष मालेगाव
मालेगावातील पाणीटंचाई निवारणासाठी न.प. प्रशासनाकडून कामास प्रारंभ
नगरध्यक्षासह नगरसेवकांचे शर्थीचे प्रयत्न
मालेगाव, दि. २८ (प्रतिनिधी):
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे मालेगाव शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मालेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. ओमप्रकाश खुरसडे, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सर्व मिळून विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष ओम खुरसडे, उपनगराध्यक्ष राधा खवले, प्रभारी मुख्याधिकारी सतीश शेवदा, पाणीपुरवठा सभापती आझाद खा पठाण यांच्यासह सर्व प्रभागातील नगरसेवक व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आमदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधी अंतर्गत शहरातील विविध प्रभागात जवळपास आठ ते दहा कूपनलिका (बोअरवेल) घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष ओम खुरसडे व संबंधित प्रभागाचे नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये २७ एप्रिल रोजी विधिवत पूजा करून बोअरवेल घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. धरण बांधारामध्ये पाणीसाठा असलेल्या ठिकाणी तात्पुरती पाईपलाईन टाकून सुद्धा पाणी पुरवठा तसेच अत्यावश्यक त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणारी तीव्र पाणीटंचाईच्या झळा शहरातील नागरिकांना बसू नये, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले असून पाणी पंचायत मात करण्यासाठी उपाय योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.



