मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे नगराध्यक्ष ओम खुरसडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी आयोजन. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार.
मालेगाव तहसील कार्यालयात आज दि,८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, समाधान शिबिर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष ओम खुरसडे हे होते तर प्रमुख उध्दघाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार दीपक पुंडे, निवासी नायब तहसीलदार श्रीमती रंजना गोरे, अरविंद कंरागंळे, सुनील देशमुख, बळीराम वाजोंळ, उपनगराध्यक्ष खवले मडम, कृषी अधिकारी प्राजक्ता कुचेकर, नगरसेवक ,मानधने बनाईतकर, मा जि प स अशोक गवळी, यांच्यासह, विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती, सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते समाधान शिबिराचे दीप प्रजल करून उद्घाटन करण्यात आले, तसेच याप्रसंगी तहसील विभागामार्फत मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरा अंतर्गत विविध महसुली कामे तसेच शासनाच्या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला, मान्यवरांच्या हस्ते यावेळी तहसील अंतर्गत तसेच इतरही विभागा अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र कागदपत्रे वाटप करण्यात आले,अमानीचे महसूल ग्राम अधिकारी, जगन महल्ले यांनी संचालन केले प्रास्ताविक तहसीलदार दीपक पुंडे यांनी केले, या अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची सखोल अशी माहिती याप्रसंगी, अप्पर जिल्हा अधिकारी, नगराध्यक्ष, पाणी फाउंडेशनचे अधिकारी, तसेच इतर अधिकाऱ्यांनी यावेळी दिली, कार्यक्रमाला सर्व विभागाचे कर्मचारी तसेच महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती,




