व्हिजन २०२६

दृष्टीक्षेप २०२६

मालेगाँव जहाँगीरसाठी एक व्यापक विकास योजना

धोरणात्मक उद्दिष्टे

विकासाची क्षेत्रे

शुद्ध पाणी उपक्रम

मालेगावातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे माझे सर्वोच्च ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

सन्माननीय घरे

"कोणीही झोपडीत किंवा पत्र्याच्या घरात राहू नये." मालेगावातील प्रत्येक गरजवंताला हक्काचे पक्के घर (स्लॅबचे घर) मिळवून देणे हे आमचे स्वप्न आहे.

सर्वसमावेशकता (सामुदायिक जमीन)

मालेगावातील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तानची जागा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही तातडीने पावले उचलत आहोत.

बालविकास (उद्याने)

आपल्या लहान मुलांच्या आनंदासाठी आणि शारीरिक विकासासाठी मालेगावमध्ये आधुनिक सुविधांनी सज्ज अशी सुंदर उद्याने विकसित केली जातील.

रस्ते पायाभूत सुविधा

वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी शिरपूर फाटा - बस स्टँड - विदर्भ पब्लिक स्कूल आणि मालेगाव ते नागरदास या रस्त्यांचे चौपदरीकरण करून शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल.

समाजकल्याण (सांस्कृतिक सभागृह)

गोरगरीब जनतेच्या मंगलकार्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मालेगाव नगरीत एक भव्य-दिव्य 'सांस्कृतिक सभागृह' उभारले जाईल.

युवा आणि अपंग सक्षमीकरण

तरुण उद्योजक आणि अपंग बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी विशेष 'शॉपिंग कॉम्प्लेक्स' निर्माण करून त्यांना हक्काची दुकाने उपलब्ध करून दिली जातील.

सार्वजनिक आरोग्य आणि फिटनेस

मालेगावकरांच्या आरोग्यासाठी शहराच्या विविध भागांत 'ओपन जिम' आणि निसर्गरम्य उद्यानांची निर्मिती केली जाईल.

आधुनिक बाजार

मालेगावच्या भाजी बाजाराचा कायापालट करण्यासाठी 'क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या नावाने सर्व सोयीसुविधायुक्त असे भव्य मार्केट उभारले जाईल.

सुरक्षा आणि स्मार्ट सिटी वैशिष्ट्ये

सुरक्षित आणि सुसज्ज मालेगावसाठी शहरातील सर्व रस्ते, प्रगत पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करून आधुनिक सुरक्षा व्यवस्था दिली जाईल.

आमची तत्त्वे

मूळ मूल्ये

लोकसेवा

करुणा आणि वचनबद्धतेने वाशिमच्या प्रत्येक नागरिकाची सेवा करण्यासाठी समर्पित.

पारदर्शक प्रशासन

सर्व सार्वजनिक सेवेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी वचनबद्ध.

सर्वसमावेशक विकास

विकास समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल याची खात्री करणे.

वाशिमचे भविष्य घडवण्यात आमच्यासोबत सामील व्हा

व्हिजन 2026 साध्य करण्यासाठी तुमचे विचार आणि अभिप्राय महत्त्वाचे आहेत. आमच्या इनोव्हेशन लॅबद्वारे तुमचे विचार शेअर करा.

तुमची कल्पना सांगा